esakal | प्रभू राम यांचे आम्ही वंशज: भाजप खासदार
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MP Diya Kumari claims her family descended from Lord Ram

जयपूरचे राजा आणि माझे पती हे भवानी सिंह कुश यांची 309 पिढी आहे. याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत.

प्रभू राम यांचे आम्ही वंशज: भाजप खासदार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर : प्रभू श्रीराम यांचे वंशज जगभरात पसरले आहेत, आम्हीही प्रभू राम यांचे पुत्र कुश यांचे वंशज असून, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा जयपूर राजघराण्यातील राजकुमारी आणि भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी केला आहे. दिया कुमारी यांनी याबाबत ट्विट केले आहे.

अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान रामलल्ला यांच्या वकीलांना विचारण्यात आले की, प्रभू श्री रामाचे कोणी वंशज अयोध्या अथवा जगातील कोणत्या कोपऱ्यात आहेत का? यावर वकीलांना आम्हाला त्याची माहिती नाही, मात्र ती माहिती घेऊ असे सांगितले. यावर भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी आम्ही वंशज असल्याचा दावा केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेची बोलताना दिया कुमारी म्हणाल्या, 'जयपूरमधील राजघराणे प्रभू श्रीरामाचे वंशज आहे. याबाबतची हस्तलिखीत, वंशावळी आणि दस्तावेज आमच्याकडे उपलब्ध आहेत. जयपूरचे राजा आणि माझे पती हे भवानी सिंह कुश यांची 309 पिढी आहे. याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत. प्रभू श्रीरामाच्या वंशजाची नावांमधील कागदपत्रात 289व्या वंशजाच्या यादीत सवाई जयसिंह आणि 307 वी पिढी महाराजा भवानी सिंह यांचे नाव आहे.'

दरम्यान, रामजन्मभूमी वादाबाबतच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात आठवड्यातले पाच दिवस सुनावणी होत असून, त्याबद्दल एका मुस्लिम पक्षकाराने आक्षेप घेतला आहे. एवढ्या घाईने हा खटला चालविला जाणार असल्यास सहकार्य करणे शक्य होणार नाही, असे या पक्षकाराच्या वकिलाने म्हटले आहे.

loading image