शाळेच्या बाहेर हवे ते कपडे घाला : हेमा मालिनी

hema malini
hema malinihema malini

नवी दिल्ली : कर्नाटकात हिजाबवरून राजकारण (Karnataka Hijab Row) चांगलंच तापलं आहे. हिजाब घातलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. यावरून काँग्रेसने कर्नाटक सरकारवर देखील टीका केली आहे. आता भाजप खासदार हेमा मालिनी (BJP MP Hema Malini) यांनी हिजाब वादात उडी घेतली असून शाळेच्या बाहेर तुम्हाला वाटतं ते परिधान करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

hema malini
'बिकिनी असो की घुंघट, तो...' प्रियंका गांधींची हिजाबवरून थेट प्रतिक्रिया

शाळा या शिक्षणासाठी आहेत. त्यामुळे धर्माच्या गोष्टी शाळेत करू नयेत. प्रत्येक शाळेला गणवेश असतो आणि त्या गणवेशाचा सर्वांनी आदर करायला पाहिजे. शाळेच्या बाहेर तुम्हाला वाटतं ते परिधान करा, असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.

कर्नाटकात हिजाबवरून वाद नेमका कधी सुरू झाला? -

गेल्या डिसेंबर महिन्यात उडुपीतील एका महाविद्यालयात हिजाब घातलेल्या सहा मुलींना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाला तक्रार केली. पण, विद्यार्थ्यांना गणवेशातच शाळेत यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब घालू देण्याची मागणी केली. पण, विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या तर आम्ही भगवे शेले घेऊन येऊ, अशी भूमिका हिंदूत्वादी विद्यार्थ्यांनी घेतली.

वाद कसा चिघळला?-

हिजाब घातलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नव्हता. त्यानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन केले. हे हिजाबचे लोण हळूहळू उडपीच्या आजूबाजूच्या परिसरात देखील पसरले. मुली हिजाब घालून येत असल्यानं हिंदूत्ववादी विद्यार्थी भगवे शेले घेऊन शाळेत येत होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण चांगलंच चिघळलं. मंगळवारी भगवे शेले घेतलेल्या विद्यार्थ्यांनी एका मुस्लीम मुलीला घेराव घातला आणि ''जय श्री राम'' अशा घोषणा दिल्या. त्यानंतर तिने ''अल्लाह हू अकबर'' म्हणत त्यांना उत्तर दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com