गोडसे राग आळवल्यानंतर आता, प्रज्ञासिंह ठाकूर यांचा माफिनामा 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

'सभागृहात माझ्याकडून झालेल्या वक्तव्यामुळे कोणाला कोणत्याही प्रकारच्या वेदना झाल्या असतील तर, त्यासाठी मी खेद व्यक्त करते आणि क्षमा मागते.', अशा शब्दांत साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली.

नवी दिल्ली : भाजपच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागितली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त संबोधित करणं, खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना महागात पडलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सदस्यपदावरून हकालपट्टी करण्यात आलीय.

ताज्या बातम्यांसाठी वाचा ई-सकाळचे एप

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गोडसेचा उल्लेख देशभक्त केल्यानंतर देशात राष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली होती. राहुल गांधी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी साध्वी प्रज्ञा यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. एका विशिष्ठ विचारसरणीच्या गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली. त्याचे उदाहरण तुम्ही देशभक्त म्हणून देऊच शकत नाही, अशी प्रतिक्राया डेएमके नेते ए. राजा यांनी दिली होती. आज, लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर दुपारच्या सत्रात 'सभागृहात माझ्याकडून झालेल्या वक्तव्यामुळे कोणाला कोणत्याही प्रकारच्या वेदना झाल्या असतील तर, त्यासाठी मी खेद व्यक्त करते आणि क्षमा मागते.', अशा शब्दांत साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली.

आणखी बातम्या वाचा - गोव्यात राजकीय भूकंप? वाचा काय घडतंय गोव्यात

आणखी बातम्या वाचा - मोदी अंघोळ कुठे करतात माहिती आहे?

मला दहशतवादी कसे म्हणता? 
प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभेत माफी मागताना, 'माझ्यावरील आरोप सिद्ध झालेले नसताना तुम्ही मला दहशतवादी कसे म्हणता,' असा सवाल प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलाय. असा प्रश्न उपस्थित करताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेतलेले नाही. प्रज्ञासिंह ठाकूर, यांनी लोकसभेत गोडसेचा उल्लेख देशभक्त केल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले होते. 'दहशतवादी प्रज्ञाने गोडसेचा उल्लेख, देशभक्त केला. भारताच्या संसदीय इतिहासातील हा दुःखद दिवस आहे.'

मोदी म्हणतात, 'मी कधीच माफ करणार नाही'
महात्मा गांधीजी आणि नथुराम गोडसे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने केलेले वक्तव्य दुदैवी आहे आणि समाजासाठी चुकीचे आहे. तिने माफी मागितली असली तरी मी तिला कधीच पूर्णपणे माफ करू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mp pragya singh thakur apologize in lok sabha on godse statement