
BJP MP’s Son in Harassment Case: लैंगिक छळ प्रकरणातील आरोपीची असिस्टंट एडवोकेट जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. भाजप खासदाराच्या मुलाला २०१७ मध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग करण्याच्या आणि अपहरणाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं. सध्या तो जामीनावर बाहेर असून खटला चंडिगढ न्यायालयात प्रलंबित आहे. विकास बराला असं आरोपीचं नाव आहे. तर त्याचे वडील सुभाष बराला हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत.