'...तर आसाराम बापूंची प्रथम सुटका करा'

bjp mp subramanian swamy demands release of asaram bapu
bjp mp subramanian swamy demands release of asaram bapu

नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायसमुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुबमण्यम स्वामी यांनी स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापूची सुटका करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील जवळपास ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील इतर राज्यातही कैद्यांची सुटका करण्यासंबंधी विचारविनिमय अन् मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर, भाजपाचे नेते आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुबमण्यम स्वामी यांनी आसाराम बापूची (वय 85) सर्वात प्रथम सुटका करण्याची मागणी केली आहे.

जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात कैद असलेले आसाराम आणि राजस्थान सरकारचे माजी मंत्री महिपाल मदेरणा यांच्यासह इतर कैद्यांनी कारागृहातच उपोषण सुरू केले. कारागृहात कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सुटकेची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील कैद्यांनी मंगळवारी (ता. 24) उपोषण केले. सकाळच्या वेळी कारागृहात भोजन बनवण्यात आले होते. मात्र, या कैद्याने भोजन करण्यास नकार दिला. हे कैदी कारागृहातून सुटका करण्याची मागणी करत आहेत. यानंतर आता प्रशासनाने, ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी तयार केली असून, ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे. यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल, असे म्हटले आहे. या मागणीनंतर सुब्रमण्यस स्वामी यांनी आज (सोमवार) ट्विवटरवरुन आसाराम बापूची सर्वप्रथम सुटका करा, अशी मागणी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केल्यानंतर नेटीझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या दोषी किंवा खटला दाखल असलेल्या आरोपी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळ-जवळ ११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पुढील आठवड्याभरात यावर कार्यवाही व्हावी, अशाही सूचना दिल्याचे देशमुख यांनी ट्विटरवरून सांगितले आहे. त्यानुसार, कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com