esakal | Video: ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी झुंबड...
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus lockdown rajasthan flour mini truck viral video

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. देश लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांचे हाल होत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

Video: ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी झुंबड...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोटा (राजस्थान): कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. देश लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांचे हाल होत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ट्रकमधील पिठाची पोती लुटण्यासाठी झुंबड उडाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात लॉकडाऊनमुळे अनेक भागात गैरसोय होत आहे. राजस्थानमधील कुन्हाडी पोलिस स्टेशन परिसरातील नांता भागात शनिवारी (ता. 28) दुपारी काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एका मिनी ट्रकवर दरोडा टाकला. नागरिकांनी या ट्रकमधील धान्य आणि पीठाची पोती पळवून नेली. ही  घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नागरिक मिनी ट्रकच्या मागे पिठाची पोती आणि धान्य लुटण्यासाठी पळताना दिसत आहेत. या मिनी ट्रकवर बजरंगपती मील असे लिहिलेले दिसत आहे. पण, लॉकडाऊन असताना एवढे नागरिक रस्त्यावर आले कुठून? असा प्रश्न नेटिझन्स उपस्थित करताना लूट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू