JP Nadda Resigns: जे पी नड्डा यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; 'हे' कारण आलं समोर

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात राजकीय भूंकप होता होता राहिला.
JP Nadda
JP Nadda

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी स्विकारला आहे. पार्लमेंटच्या डेली बुलेटिनमधून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, नड्डा यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा का दिला याचं कारणही समोर आलं आहे. (BJP National President JP Nadda resigns from his position as Rajya Sabha MP)

नड्डांनी का दिला राजीनामा?

नड्डा यांना गुजरातमधून नुकतीच भाजपनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली होती. या ठिकाणी भाजपचे चारही उमेदवार नुकतेच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये नड्डा यांचाही समावेश आहे. हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर गेलेल्या नड्डा यांची टर्म संपण्याआधी त्यांना भाजपनं गुजरातमधून उमेदवारी दिली. त्यामुळं सहाजिकचं त्यांनी आधीच्या राज्यसभा निवडणुकीच राजीनामा दिला आहे. (Latest Marathi News)

हिमाचल प्रदेशात राजकीय भूकंप

जेपी नड्डा ज्या हिमाचल प्रदेशातून येतात त्या हिमाचल प्रदेशात सध्या काँग्रेसचं सरकार आहे. या सरकारमधील ६ आमदारांनी नुकतंच बंड करत राज्य सभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळं काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला. यानंतर भाजपच्या नेत्यांनी तसेच विरोधी पक्ष नेत्यानं राज्यपालांची भेट घेऊन राज्यात सरकारविरोधात विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी केली होती. (Marathi Tajya Batmya)

यावरुन हिमाचल प्रदेशातही इतर राज्यांप्रमाणं काँग्रेसचं सरकार कोसळणार? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण दुसऱ्या दिवशी तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांना थेट अपात्र ठरवलं. त्यामुळं काँग्रेसमधील हे बंड थोपवण्यात काँग्रेसला यश आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com