Vinod Tawde News : भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नितीन नवीन यांचा निर्णय; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!

Nitin Navin assigns key roles to Vinod Tawde : मंत्री आशिष शेलार यांनाही एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
BJP National President Nitin Nabin assigns major responsibility to Vinod Tawde

BJP National President Nitin Nabin assigns major responsibility to Vinod Tawde

esakal

Updated on

BJP National President Nitin Nabin नितीन नवीन हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. आज (मंगळवार) त्यांची भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड झाली आणि त्यांनी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर नितीन नवीन यांनी यावर्षी देशभरात होणाऱ्या विविध राज्यांच्या निवडणुकांसाठी काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

यामध्ये त्यांनी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना निवडणूक प्रभारी आणि शोभा करंदलाजे यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सध्याचे मंत्री आशिष शेलार यांनाही एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त विनोद तावडे यांना चंदीगड महापौर निवडणुकीसाठीही जबाबदारी सोपवली गेली आहे. तर, राम माधव यांना ग्रेटर बंगळुरू महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये सतीश पूनिया आणि संजय उपाध्याय यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच नितीन नवीन यांनी आगामी तेलंगणा महानगरपालिका निवडणुकीसाठी आशिष शेलार यांना निवडणूक प्रभारी, अशोक परनामी आणि रेखा शर्मा यांना निवडणूक सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.

BJP National President Nitin Nabin assigns major responsibility to Vinod Tawde
Toll Tax New Rules : आता 'या' वाहनांना 'फिटनेस सर्टिफिकेट' अन् 'एनओसी'ही मिळणार नाही!

कोण आहेत नितीन नवीन? -

नितीन नवीन हे बिहारमधून पाच वेळा आमदार राहिले आहेत आणि १४ डिसेंबर रोजी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी राज्य सरकारमध्ये कायदा आणि न्याय, शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केले आहे. भाजप अध्यक्षांनी पक्ष कार्यकर्त्यांना बूथ आणि मंडळ पातळीवर पूर्ण निष्ठा आणि समर्पणाने काम करत राहण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com