मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भाजपकडून पैशाचे आमिष; कमलनाथ यांचा आरोप | BJP offers money to congress mala for voting in Presidential elections says Kamalnath | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi And Kamlnath

मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भाजपकडून पैशाचे आमिष; कमलनाथ यांचा आरोप

भोपाळ : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदारांना मोठ्या रकमेची ऑफर देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ यांनी गुरुवारी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत हा आरोप केला. (droupadi murmu and yashwant sinha news in marathi)

हेही वाचा: मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंवर दबाव आणला; सिन्हांचा आरोप

काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एका आमदाराने एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्याच्या मोबदल्यात फोनवरून मोठ्या रक्कमेचा प्रस्ताव मिळाल्याची माहिती दिली होती. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी माहिती देणारे आमदार माजी मंत्री आणि प्रमुख आदिवासी नेते आहेत. ते म्हणाले की, भाजपचे लोक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आदिवासी लोकांना अमिष दाखवायचे किंवा धमकावायचे, आता त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूकही सोडली नाही.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, आणि दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसच्या आमदार/खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा आरोप केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे आव्हान आहे.

हेही वाचा: शिंदे १८ तास काम करणारे मुख्यमंत्री; अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

सिन्हा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार आणि अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. भाजपशी संबंध तोडून त्यांनी आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Web Title: Bjp Offers Money To Congress Mala For Voting In Presidential Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..