भाजपचा डाव फसला; झारखंड मधील सरकार स्थिर

आमदार आसाममध्ये पोहोचण्यापूर्वीच पोलीसांच्या ताब्यात
Jharkhand CM
Jharkhand CMesakal

महाराष्ट्रात ठाकरे सरकार कोसळल्या नंतर आता झारखंड मध्ये पण कमळ फुलणात का असा प्रश्न पडू लागला आहे. त्याला कारण ही तसच आहे, झारखंड मध्ये कॉंग्रेसच्या तीन आमदारांनकडे करोडो रूपयांची रोकड सापडल्याने त्यांना बंगाल पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने आसामचे मुख्यमंत्री चांगलेच चर्चेत आले आहेत, कारण कॉंग्रेसच्या इतर आमदारांनी आरोप केला आहे की हे तिघेही आमदार गुहाटीला जाणार होते. कारण झारखंड मध्ये भाजपला पुन्हा सत्तेत आणायचे आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात बंड पुकारणारे शिवसेना आमदार गुजरातमार्गे गुवाहाटी येथे पोहोचले होते. ते आसाममधील पंचतारांकित हॉटेलमध्ये दहा दिवसांहून अधिक काळ तळ ठोकून होते, त्याच वेळी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करण्यात आले.

हेमंत सोरेन सरकारविरोधात सत्तापालट करून भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असतानाच, काँग्रेस आमदार आसाममध्ये पोहोचण्यापूर्वीच पोलीसांच्या ताब्यात सापडले. झारखंड मधील कॉंग्रेस आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्छप, आणि बिक्सल कोंगारी यांना पश्चिम बंगाल पोलीसांनी करोडो रूपयां सोबत अटक केली. बंगाल मधील रानीहाटी येथील राष्ट्रीय महामार्ग-16 वरून पोलिसांनी तीन आमदारांना एसयूव्हीमधून पकडले.

त्यावर काँग्रेस आमदारा कुमार जयमंगल सिंग यांनी आरोप केला की, पश्चिम बंगालमधील ज्या आमदारांकडू रक्कम जप्त करण्यात आली होती त्यांनीही सिंगांशी संपर्क साधला आणि त्यांना कोलकत्त येथे यायला सांगिलतल होत. जयमंगल सिंह यांनी आरोप केला की तिन्ही आमदार तेथून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना भेटण्यासाठी गुवाहाटी येथे जाणार आहेत.

Jharkhand CM
Sanjay Raut ED : शिवसैनिक आक्रमक...मुंबई पोलिसांची 4 स्ट्रायकिंग फोर्स तैनात

तिथ भाजप सरकार स्थापन करण्याची योजना चालू आहे. आणि भाजप सोबत येणाऱ्या आमदारांना 10 करोड रूपये आणि भाजप सरकार मध्ये मंत्रीपद देखील दिल जाणार होत. काँग्रेस आमदार म्हणाले की, या तिघांनीही त्यांना सांगितले की आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या वर दिल्लीतील काही बड्या नेत्यांचे आशीर्वाद आहे. सिंग म्हणाले मला भ्रष्टाचाराच्या या दलदलीत अडकायचे नाही. त्यामुळे असा भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही डीसीमार्फत सरकारला माहिती देत ​​आहोत.

भाजपने झारखंडमधील युती सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, महाराष्ट्रात जे काही केले आहे तेच झारखंडमध्ये भाजपला करायचे आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले होते की, झारखंडमधील भाजपचे 'ऑपरेशन लोटस' पश्चिम बंगालमध्ये उघड झाले आहे. सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात एका राज्याचे मुख्यमंत्री स्वत: थेट आमदारांच्या संपर्कात आहेत, महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही सत्ताबदलाचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com