
नवी दिल्ली: ‘‘मतचोरीनंतर आता भारतीय जनता पक्ष सत्ताचोरीची तयारी करीत आहे. ३० दिवसांत विरोधी सरकार पाडण्यासाठी विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे; तसेच अटक हे शस्त्र वापरून लोकशाही अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (ता. २४) केला. इंदिरा भवन येथे हरियाना आणि मध्य प्रदेशाच्या जिल्हा काँग्रेस समित्यांच्या नवनियुक्त अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत खर्गे बोलत होते.