भाजपने आपल्याच खासदारांना घातल्या टोप्या..!!

आगामी काळात ब्रम्हकमळाचे चित्र असलेली ही कमळ चिन्हांकित नवी भगवी टोपी, मोदीयुगातील भाजपची नवी ओळख बनणार
BJP put hats on its own MP
BJP put hats on its own MPsakal

नवी दिल्ली: सत्तारूढ पक्षाच्या आज झालेल्या संसदीय बैठकीत येणाऱया प्रत्येक भाजप खासदाराच्या हाती एक किट देण्यात येत होते. त्यात दडलंय काय, अशी उत्सुकता कॅमेरामन बांधवांना होती व तिचे निराकरण लगेचच झाले. हे किट गुजरातच्या एनर्जी बार कंपनीने बनविलेले आहे. त्यात एक भगव्या रंगाची टोपी व एक शक्तीवर्धक बूस्टर चाॅकलेट बार प्रत्येक भाजप खासदाराला देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादेत नुकताच एक रोड शो केला तेव्हा त्यांनी हीच टोपी परिधान केली होती. आगामी काळात ब्रम्हकमळाचे चित्र असलेली ही कमळ चिन्हांकित नवी भगवी टोपी, मोदीयुगातील भाजपची नवी ओळख बनणार असे दिसत आहे.

विशेषतः भारतीय राजकारणात टोपीचे खास महत्व कायम राहिलेले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अस्सल खादीची गांधी टोपी, नंतर बराच काळ काॅंग्रेस नेत्यांच्या डोक्यावर कायम राहिलेली तशीच टोपी, जयप्रकाश नारायण आंदोलनातील खास टोपी, डाव्या कार्यकर्त्यांची प्रसिध्द टोपी असा अनेक टोप्यांनी भारतीय राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलीकडे यूपी निवडणुकीत मोदींनी समाजवादी पक्षाच्या लाल टोपीवर अत्यंत तिखट टिप्पणी केली होती. लाल टोपी नव्हे हा तर रेड सिग्नल आहे, सावध रहा हे त्यांचे आवाहन यूपीच्या जनतेने गंभीरपणे घेतल्याचे निकालांनी सिध्द केले. पण निकाल लागले त्या पाठोपाठ खुद्द मोदींच्याच नेतृत्वाखालील भाजपने रंग बदलून ही नवी टोपीच प्रचारात आणली आहे. ही टोपी भाजपच्या लोकसभा-राज्यसभेच्या ४०० हून जास्त खासदाारंना आज दिली गेली. ती साऱया सत्तारूढ खासदारांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी बालसुब्रममण्यम यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या संसदीय कार्यालयावर देण्यात आली आहे. येणाऱया काळात भाजपच्या कार्यक्रमात पक्षाची ओळख असलेले उपरणे ( उत्तर भारतात अंगवस्त्र- गमछा) पक्षनेत्यांना भेट दिले जाईल त्याबरोबरच ही नवी भगवी टोपीही त्या नेत्याला दिली जाईल असा मेसेज यानिमित्ताने देण्यात आला. दरम्यान ही नवी भगवी टोपी पक्षाची नवी ओळख म्हणून हे समजू शकते पण बूस्टर चाॅकलेट देण्यामागे सत्तारूढ खासदारांना मोदींनी दिलेला ट्रिपल (बूस्टर) डोस आहे का, याचीही चर्चा नंतर संसद परिसरात रंगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com