राहुल गांधींचा टीशर्ट ४१ हजारांचा; भाजपाची टीका, काँग्रेस म्हणाली 'महागाईवर...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

राहुल गांधींचा टीशर्ट ४१ हजारांचा; भाजपाची टीका, काँग्रेस म्हणाली 'महागाईवर...'

भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भाजपने दावा केला आहे, की 'भारत जोडो यात्रे' दरम्यान गांधी यांनी जो टि-शर्ट घातला आहे, त्याची किंमत 41,000 हजार रूपये ऐवढी आहे. भाजपने आपल्या ट्विटर अकाउंट वरून 'भारत देखो' अस ट्विट केलं आहे. आणि त्या मध्ये दोन फोटो पोस्ट केले आहेत. तर भाजपाच्या या ट्विटवर काँग्रेसने प्रत्युत्तर दिलंय. 'घाबरलात का? तुम्ही महागाईवर बोला' असं काँग्रेसने म्हटलंय.

भाजपाने शुक्रवारी ट्विटरवर राहुल गांधी यांचा फोटो शेअर केलाय. यात राहुल गांधींच्या टीशर्टवरुन निशाणा साधण्यात आलाय. राहुल यांच्या टी- शर्टची किंमत 41,257 रुपये ऐवढी असल्याचं भाजपाने म्हटलंय. राहुल गांधीनी यात्रेदरम्यान घातलेला टीशर्टची किंमत समोर आणताना भाजपाने टीशर्टच्या ऑनलाइन किंमतीचा स्क्रीनशॉटही शेअर केलाय.

'भारत छोडो यात्रा' गुरूवारी कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी मीडियाला सांगितल की, मी या यात्रेचे नेतृत्व करत नाही. फक्त या यात्रेचा भाग आहे. भाजप-आरएसएसने द्वेष पसरवून केलेले नुकसान भरून काढणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान कॉंग्रेस नेते आणि कॉंग्रेस कार्यकर्ते गांधीयांच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने ट्विट केलं आहे की यावरून समजत आहे, भाजप या यात्रेमुळे भीत आहेत. तर आणखी एका युजरने म्हटले की, गांधींनी त्यांच्या कपड्यांवर खर्च केलेला हा सार्वजनिक पैसा नाही.

Web Title: Bjp Rahul Gandhi Price Shirt Bherat Jodo Yatra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rahul GandhiBjpPricetweet