भाजपच्या झोळीत 915 कोटींचे दान

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न देशवासीयांना दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजपच्या झोळीतही पैशांचा ओघ सुरू आहे.

नवी दिल्ली ः पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न देशवासीयांना दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजपच्या झोळीतही पैशांचा ओघ सुरू आहे.

2016 ते 2018 या दोन आर्थिक वर्षात उद्योजक घराण्यांकडून 915.59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. कॉंग्रेसच्या तुलनेत ही रक्कम 16 पटीने जास्त आहे. कॉंग्रेसला 55.36 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. 

सहा राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपला भरभरून दान मिळाले आहे. कॉंग्रेसनंतर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी कॉंग्रेस असून, त्यांना 7. 737 कोटी रुपये देगणी स्वरूपात मिळाले आहेत. निवडणूक विश्‍लेषण करणारी संस्था "असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स'ने (एडीआर) प्रसिद्ध केलेल्या अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रत्येक आर्थिक वर्षात 20 हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्यांची माहिती निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. देणगी देणाऱ्यांची नावे, पत्ता, पॅन क्रमांक आणि त्यांनी दिलेल्या निधीचे विवरण पक्ष देतात. 2017-18 या वर्षात 20 हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली नसल्याचे बहुजन समाज पक्षाने स्पष्ट केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला उद्योजकांकडून सर्वांत कमी निधी मिळालेला आहे. 

2016-17 आणि 2017-18 मधील देणग्या (कोटी रुपयांत) 
1059.25 सर्व पक्षांचा एकत्रित निधी 

985.18 उद्योजकांकडून मिळालेला निधी 

915.59 भाजप 

55.36 कॉंग्रेस 

7.737 राष्ट्रवादी कॉंग्रेस 

4.42 माकप 

2.03 तृणमूल कॉंग्रेस 

0.04 भाकप 

कोणत्या उद्योग क्षेत्राकडून किती देणगी 

488.42 इलेक्‍ट्रोलर बॉंड 

49.9 बांधकाम 

74.7 उत्पादन 

अन्य देणग्या (कोटी रुपयांत) 

120 निधीचा स्त्रोत अज्ञात 

2.59 "पॅन'च्या माहितीचा अभाव 
2.50 "पॅन'च्या माहितीविना भाजपला मिळालेली देणगी 

देणगीत वाढ-घट (कोटी रुपयांत) 
2014-15 (लोकसभा निवडणुकीचा काळ) ः उद्योग क्षेत्राकडून 573.18 कोटींची जादा देणगी 
2016-17 ः 563.19 
2017-18 ः421.99 
2016-17 आणि 2017-18तील देणग्यांमध्ये 25. 07 टक्‍क्‍यांनी घट झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp received the maximum donations of rs 915 cr