Loksabha Election 2024 : पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी; भाजपची दुसरी यादी जाहीर

BJP releases its second list: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील वीस नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.
BJP
BJP
Updated on

नवी दिल्ली- भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील वीस नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा यादीमध्ये समावेश आहे.(BJP releases its second list of candidates for the upcoming Lok Sabha elections)

नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून श्रीमती स्मिता वाघ, रावेतमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव चिखलिकर, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश आहे.

BJP
Adhiraranjan Chaudhary : तृणमूलमध्ये पक्षांतर्गत संघर्ष; काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांचा दावा

डिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील, मुंबई उत्तरमधून पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बीडमधून पंकजा मुंडे, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

कोणत्या उमेदवारांना मिळाली संधी, पाहा यादी

१.नंदुरबार - डॉ. हिना गावित

२,धुळे- सुभाष भामरे,

३.जळगाव- स्मिता वाघ

४.रावेत- रक्षा खडसे

५.अकोला-अनूप धोत्रे,

६. वर्धा- रामदास तडस

७. नागपूर- नितीन गडकरी

८.चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

९.नांदेड- प्रतापराव चिखलिकर

१०. जालना- रावसाहेब दानवे

११.डिंडोरी- भारती पवार

१२.भिवंडी- कपिल मोरेश्वर पाटील

१३.मुंबई उत्तर- पियूष गोयल

१४.मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा

१५.पुणे- मुरलीधर मोहोळ,

१६.बीड- पंकजा मुंडे

१७.अहमदनगर- सुजख विखे पाटील

१८.लातूर- सुधाकर श्रृंगारे

१९.माढा- रणजीत सिंह निंबाळकर

२०.सांगली- संजयकाका पाटील

भाजप आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करेल अशी शक्यता होती. त्याप्रमाणे आज भाजपने उमेदवारी जाहीर केली असून महाराष्ट्रातून अनेक नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये १९५ उमेदवारांची नावे होती.

BJP
Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचारही महागला; व्हेज 150 तर नॉनव्हेज 250 रुपये थाळी

महाराष्ट्रामध्ये जागावाटपावरुन भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु होती. अद्याप या तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. पण, भाजपकडून महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हे पाहावं लागणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MHADA Announces Second Draw for 634 Affordable Homes in Tathawade, Pune
advocate
The announcement brings major relief to Maratha and Kunbi students awaiting financial assistance for higher education.
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com