Nitish Kumar News : नितीश कुमार पुन्हा NDAमध्ये परतले तर फायदा कोणाला? जाणून घ्या सविस्तर

Nitish Kumar News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Nitish Kumar Politics
Nitish Kumar Politics

Nitish Kumar Politics Latest News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे सध्या बिहारचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नितीश कुमार यापूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. इंडिया आघाडी नितीश यांना संयोजक पद न दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागा वाटपाला होत असलेला उशीर आणि लालू प्रसाद यादव कुटुंबाकडून जनता दल (युनायटेड) तोडणे आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाचे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. यामुळेच नितीश कुमार नाराज असून त्यांनी मोठा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

२०१३ मध्ये (लोकसभा निवडणुकीच्या आधी) आणि २०२२ (२०२० च्या राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर) मध्ये एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर हा दुसऱ्यांदा होणारी घरवापसी असणार आहे.

जागावाटपाची रणनीती, प्रचार यासोबत इंडिया आघाडीशी संबंधित प्रत्येक गोष्ट संथ गतीने सुरू असल्याने नितीश कुमार हे काँग्रेस पक्षावर नाराज होते. महत्वाची बाब म्हणजे भाजपशी टक्कर देण्यासाठी गेल्या वर्षी जून-जुलैमध्ये विविध विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचे श्रेय नितीश कुमार हे स्वत:ला देतात.

Nitish Kumar Politics
Bihar Politics : "मी मृत्यू पत्करेन, पण…", पलटी मारण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

२०२३ च्या शेवटी सत्तापालट होण्याच्या चर्चांदरम्यान जेडीयूचे १२ आमदारांसह ललन सिंह हे लालू यादव यांच्यासोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या, त्यानंतर त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि नितीश कुमार यांनी पक्षाची सुत्रे हातात घेतली.

आरजेडीसह बहुतांश पक्ष नितीश यांना संयोजक म्हणून पाठिंबा देत असतानाही, १३ जानेवारीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत, राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांची अनुपस्थिती आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना या पदावर नियुक्त करण्याबाबत साशंकता व्यक्त केली होती.

नितीश कुमार एनडीएमध्ये परत येण्याचं कारण काय?

नितीश कुमार यांच्या एनडीएत परत येण्याची तीन कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे एक दिवस देशाच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसणे. तर दुसरं कारण २०१९ च्या निवडणूकीत जेडीयूने जिंकलेल्या लोकसभेच्या जागा (१६) आगामी निवडणूकीत राखणे. तिसरं कारण हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जास्तीत जास्त काळ स्वतःकडे ठेवणे हे असू शकते.

पहिला उद्देश (पंतप्रधान पद) पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक बनने आवश्यक होते. तसेच तीन राज्यात विधानसभा निवडणूकात पराभव मिळाल्याने काँग्रेसच्या भाजपला टक्कर देण्याच्या क्षमतेवर सध्या अविश्वास दाखवला जात आहे. काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवून भाजपला २०२४ मध्ये रोखू शकण्याची शक्यता आता खूप कमी मानली जात आहे.

Nitish Kumar Politics
Bihar Political Crisis : बिहार सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची उच्चस्तरीय बैठक; अमित शाह यांच्यासह विनोद तावडे...

जेडीयूने २०१९ मध्ये भाजपसोबत युती करून मिळवलेल्या १७ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या, २०४४ च्या तुलनेत १४ जागांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. २०१४ मध्ये पक्षाने एकट्याने निवडणूक लढवली होती. राममंदिर उद्घाटनानंतर तयार झालेल्या वातावरणामुळे नितीश यांना जेडीयू यापैकी बहुतांश जागा गमावू शकते असे वाटू शकते. यापैकी आठ जागांवर आरजेडी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता आणि या जागांसाठीच्या उमेदवारीवर दावा करत असल्याने जागावाटपाची पुढील चर्चाही थांबली होती.

२०१९ मधील बहुतांश जागा राखण्यासाठी भाजपसोबत युती आवश्यक आहे. दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांच्या मते, ही नैसर्गिक युती आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रणाणात मतांचे हस्तांतरण झाल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे.

या परिस्थितीमुळे, नितीश यांच्याशिवाय भाजप किंवा आरजेडी दोघेही सरकार स्थापन करू शकणार नाहीत. या दोन्ही पक्षांना आघाडी स्थापन करावी लागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे महाआघाडीकडे तेजस्वीच्या रूपाने एक मजबूत दावेदार आहे जो आपला दावा कायम ठेवेल, तर एनडीएमध्ये त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी कोणीही नेता नाही.

एनडीएला नितीश कुमारांची गरज काय?

२०२२ मध्ये नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा युती तोडल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे मतभेद सुरू झाले होते. त्यांना पुन्हा कधीही एनडीएमध्ये न घेण्याची शपथ देखील वरिष्ठांकडून घेण्यात आली होती.

मात्र भाजपने २०२४ साठी ५० टक्के वोट शेअर आणि ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे ध्येय निश्चित केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भाजपला सहकारी पक्षांती आवश्यकता आहे आणि जेडीयू हा पक्ष एनडीएमध्ये १० ते १५ जागा मिळवून देऊ शकतो. काँग्रेसचं लोकसभा निवडणूकीत ४०४ जागी जिंकल्याचं रेकॉर्ड ब्रेक करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

Nitish Kumar Politics
Nitish Kumar Resigned: नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपकडून पाठिंबा

आता इंडिया आघाडीचं काय होणार?

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीकडून लोकसभा निवडणूकीची तयारी केली जात आहे.

मात्र पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत झालेले नाही. तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसला ११ जागा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यानंतरही जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यामुळे पक्षात फूट पडली असली तरी शिवसेनेतील उद्धव गट २३ जागांची मागणी करत असून, जेडीयू देखील बाहेर पडणार असल्याच्या अफवा आहेत, अशा स्थितीत इंडिया आघाडीचं भविष्य फार काही चांगलं दिसत नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com