भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
Sunday, 25 August 2019

- भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची प्रकृती अचानक बिघडली.

- कानपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना कानपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार केले जात आहेत. 

मुरली मनोहर जोशी सध्या 85 वर्षांचे आहेत. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासह केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Senior Leader Murli Manohar Joshi admitted in Hospital