Mani Shankar Aiyar : फाळणीचा प्रश्न अनुत्तरितच असल्याने पहलगाम हल्ला : मणिशंकर अय्यर यांचा दावा
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मणिशंकर अय्यर यांच्या फाळणीसंबंधीच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने अय्यर यांच्यावर पाकिस्तानला पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानीबरोबरील संबंध तणावाचे झाले असतानाच काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.