
नवी दिल्ली : ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरील कथित हल्ला म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठीची नवी खेळी असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. ग्रेटर कैलाश भागात केजरीवाल यांच्या अंगावर एका व्यक्तीने पाणी फेकण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, केजरीवाल यांच्यावर स्पिरीट टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा हा कट होता असा आरोप ‘आप’ने केला आहे.