
BJP Vs Congress
Sakal
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा मतचोरीचा आरोप म्हणजे कपटी राजकारण असल्याची टीका भाजपकडून बुधवारी करण्यात आली. बिहारची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. मात्र मतदारयादीत नाव सामील होण्याच्या अथवा हटविण्याच्या दृष्टीने काँग्रेसने एकही तक्रार केली नाही. यावरुन मतचोरीचा त्या पक्षाचा आरोप म्हणजे राजकीय स्टंट असल्याचे सिद्ध होते, असे भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.