'2014चे निकाल ठरलेले; भाजपसह इतर पक्ष ईव्हीएम गैरव्यवहारात'

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जानेवारी 2019

भाजपच नाही तर काँग्रेस, बसप, सप यांच्यासह डझनभर पक्षांना ईव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होते, असा दावा लंडनच्या सायबर एक्स्पर्टने केला आहे. 

नवी दिल्ली : भाजपच नाही तर काँग्रेस, बसप, सप यांच्यासह डझनभर पक्षांना ईव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होते, असा दावा लंडनच्या सायबर एक्स्पर्टने केला आहे. 

सय्यद शुजा असे या सायबर एक्सपर्टचे नाव आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना होती. तसेच फक्त भाजपाच नाही तर इतर पक्षांनाही ईव्हीएम गैरव्यवहार कसा करतात हे ठाऊक आहे, असे या सय्यद शुजाने म्हटले आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुका या ईव्हीएममध्ये घोळ करुन त्यांचे निकाल नियोजित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांच्या निवडणुकाही मॅनेज करण्यात आल्या होत्या असाही आरोप सय्यद शुजा याने केला आहे. लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्याने हा दावा केला आहे. 

लंडनमध्ये सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बलही हजर आहेत. इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनने या परिषदेचे आयोजन केले आहे. २०१४ मध्ये ईव्हीएम घोटाळा करण्यात आल्याचा आरोप बऱ्याचदा करण्यात आला आहे. काँग्रेस, आप यांसह सगळ्याच पक्षांनी हा दावा केला होता. आता हाच आरोप कुठेतरी वास्तवात समोर येताना दिसतो आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या काही कालावधी आधीच हे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp Sp Bsp Congress Aap Involved In Evm Rigging Claims Expert