Uttar Pradesh : फक्त भाजपा हाच पक्ष मुस्लिमांचा खरा शुभचिंतक; उपमुख्यमंत्र्यांचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Muslim Community in UP
Uttar Pradesh : फक्त भाजपा हाच पक्ष मुस्लिमांचा खरा शुभचिंतक; उपमुख्यमंत्र्यांचं विधान

Uttar Pradesh : फक्त भाजपा हाच पक्ष मुस्लिमांचा खरा शुभचिंतक; उपमुख्यमंत्र्यांचं विधान

भारतीय जनता पार्टी हीच मुस्लिमांची खरी शुभचिंतक आहे, असं विधान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. भाजपाच्या एका सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी इतर पक्षांवर टीका केली आहे. सेक्युलर पक्ष मुस्लिमांकडे व्होट बँक म्हणून बघतायत, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा: Uttar Pradesh: अयोध्येत राममंदिराआधीच योगी आदित्यनाथांचं मंदिर; दररोज होते पूजाअर्चा

पासमंदामध्ये भाजपाने मुस्लिमांसाठी एक सभा घेतली होती. यासभेमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी इतर पक्षांवर जोरदार टीका केली आहे. पाठक म्हणाले, "सेक्युलर पक्षांनी मुस्लिमांना केवळ व्होट बँक म्हणून पाहिलं आहे. मुस्लिम मतं घेऊन हे पक्ष सत्तेत आले. पण त्यांनी कधीही मुस्लिमांना त्यांचे हक्क मिळवून दिले नाहीत. म्हणूनच सध्या मुस्लिम मागासलेले राहिले आहेत."

पुढे उपमुख्यमंत्री पाठक म्हणाले की, भाजपा हाच पक्ष मुस्लिमांचा खरा शुभचिंतक आहे. मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे. आमचं सरकार मुस्लिम समाजासाठी विविध योजना राबवत आहे. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री दानिश आझान अन्सारीदेखील उपस्थित होते. इतर कोणताही पक्ष भाजपाप्रमाणे मुस्लिमांना शिक्षण, सुरक्षा, अशा सुविधा प्रदान करत नाही, असं अन्सारी म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम समाजाला चांगलं शिक्षण देण्यावर विशेष भर दिला असल्याचंही अन्सारी यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :Uttar Pradesh