मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्याचा भाजपचा प्रयत्न - केजरीवाल

निवडणुकीचे वारे वाहत असलेल्या गुजरातमध्ये केजरीवालांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Delhi CM Arvind Kejriwal Gujarat tour
Delhi CM Arvind Kejriwal Gujarat tour

अहमदाबाद : गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दिल्ली आणि पंजाबनंतर आम आदमी पार्टीनं आता गुजरात जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल हे सातत्यानं गुजरातचा दौरा करत आहेत. आजही ते गुजरातमध्ये होते या ठिकाणी एका सभेत बोलताना त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मागच्या दारानं भाजपं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (BJP trying to make Sonia Gandhi PM through backdoor alleges Kejriwal in Gujarat)

आपच्यावतीनं अहमदाबाद इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला केजरीवाल यांनी संबोधित केलं. ते म्हणाले, भाजपवाले विचारत आहेत की, मेधा पाटकर आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असणार आहेत का? यावर माझं उत्तर आहे की, मोदीजी मागच्या दरवाज्यानं सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. केजरीवाल यांनी असंही म्हटलं की, काँग्रेस आता संपली आहे त्यामुळं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं बद करा.

Delhi CM Arvind Kejriwal Gujarat tour
शिवाजी पार्क वगळलं? आता 'या' ठिकाणी होणार शिंदे गटाचा दसरा मेळावा

मी गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये फिरत असून जनेतेला भेटत आहे. वकिल, ऑटो ड्रायव्हर, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मला सांगितलं की, इथं खूपच भ्रष्टाचार आहे. लोकांना कोणत्याही सरकारी विभागातून काम करवून घ्यायचं असेल तर पैसे द्यावे लागतात. यांच्याविरोधात जर काही बोलला तर भीती दाखवून आणि घाबरवायला तयार असतात. व्यापाऱ्यांना आणि उद्योगपतींना छापेमारीच्या धमक्या दिल्या जातात आणि तुमचा धंदा बंद करण्याच्या धमक्या दिल्या जातात. चारीबाजूंना भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीचं वातावरण आहे. आम्ही आज गॅऱंटी देतो की, गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शासन देऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com