शिवाजी पार्क वगळलं? आता 'या' ठिकाणी होणार शिंदे गटाचा दसरा मेळावा

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde

मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट यंदाचा दसरा मेळावा घेणार असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं आहे. शिंदेंचा मेळावा शिवतीर्थावर होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी परवानगीसाठी अर्ज केलेला असतानाही अद्याप त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. पण आता शिंदे गटाच्या मेळाव्याचं ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती मिळते. हा मेळावा शिवतीर्थावर नव्हे तर बीकेसीच्या मैदानावर होणार असल्याच्या शक्यतेचं वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. Skipped Shivaji Park Dussehra rally of ShivSena by Shinde group could be held at Mumbai BKC ground)

Eknath Shinde
निफ्टीला पाच महिन्यांनंतर 'अच्छे दिन'; 18,000 पॉईंट्सच्यावर झाला बंद

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत. त्यामुळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तयार झालेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ही परंपरा पुढे कोण सुरु ठेवणार याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यासाठी दोन महिने आधीच महापालिकेकडं अर्ज दाखल केला आहे. पण त्यांना अद्याप यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

Eknath Shinde
कर्करोगाला अधिसूचित आजार घोषीत करा; संसदीय समितीची केंद्राला शिफारस

उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही, त्यातच एकनाथ शिंदे देखील दसरा मेळावा घेणार असल्याचं एव्हाना नक्की झालं आहे. त्यामुळं शिंदेंनी दरसालप्रमाणं शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच घ्यावा अशी शिंदे गटाची तीव्र इच्छा आहे.

दरम्यान, शिवतीर्थावर शिंदे गटाचा मेळावा झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण शक्यता असल्यानं हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा आग्रह मागे घेत बीकेसीच्या मैदानावर हा मेळावा घेण्याची तयारी सुरु असल्याचं सूत्रांनी हवाल्यानं सांगितलं जात आहे. यासंदर्भात आज शिंदे गटाची बैठकही पार पडणार आहे. या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com