Bjp Vs Congress: नक्षलवाद मोडण्यात केंद्राचे योगदान नाही; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा दावा!

Congress BJP
Congress BJPsakal

Bjp Vs Congress: भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातल्या सरकारने राज्यातील नक्षलवाद मोडून काढण्यास कोणतीही भूमिका बजावलेली नाही. कारण २०१४ आणि २०१८ दरम्यान भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या काळात नक्षलवादी कारवाया वाढल्याचा आरोप छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला.

'पीटीआय' दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेत येईल आणि आपण मुख्यमंत्री असू किंवा नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे ते म्हणाले. काँग्रेस सरकारने छत्तीसगडमध्ये विकास, विश्वास आणि सुरक्षा या तीन रणनितीच्या आधारे नक्षलवाद्यांना चाप बसविण्याचा प्रयत्न केला, असे बघेल म्हणाले.

मुलाखतीत आपल्या सरकारवर भाजपकडून होणाऱ्या आरोपांचा इन्कार केला. आपल्या सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचे बघेल म्हणाले. तपास यंत्रणेमार्फत निवडणुकीवर परिणाम करण्याचा प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Congress BJP
Loksabha Election : राज्‍यात 48 पैकी महायुतीचे 45 खासदार निवडून येतील; BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास

गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाबाबत केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “२०१४-२०१८ या काळात छत्तीसगड येथे डबल इंजिनचे सरकार होते. या काळात नक्षलवाद वाढला. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारने विकासाचे धोरण लागू केले. विश्वास आणि सुरक्षा या आधारावर नक्षलवाद्यांना मागे हटावे लागले. यात भाजपची कोणतीच भूमिका नाही. आणि ते चिथावणीखोर आहेत. मणिपूर जळत आहे, मात्र तेथे जात नाहीत."

यादरम्यान, शहा यांनी काँग्रेसच्या काळात नक्षलवाद बळावला असल्याचा आरोप केला. मोदी सरकारच्या काळात नक्षल घटनांत ५२ टक्के घट झाली असल्याचे म्हटले. भाजप सत्तेवर आल्यास छत्तीसगड नक्षलमुक्त होईल, असा दावा त्यांनी केला.

Congress BJP
Jalgaon Sand News : बांभोरी पुलाखालचे तळ पोखरले... आता रेल्वे पुलालगत वाळू तस्करी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com