Loksabha Election : राज्‍यात 48 पैकी महायुतीचे 45 खासदार निवडून येतील; BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास

उद्धव ठाकरे यांच्याकडे आता उरलेले सर्व आमदार शिंदे गटात जातील.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankuleesakal
Summary

बावनकुळे आपल्‍या पदयात्रेत माईक घेऊन देशाचा पुढील पंतप्रधान कोण? अशी विचारणा करताना रत्‍नागिरी दौऱ्यात एकाने राहुल गांधी हे पुढील पंतप्रधान असतील, असे सांगितल्‍याने बावनकुळेंची गोची झाली.

कणकवली : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, राज्‍यात शिंदे, फडणवीस आणि पवार यांचे सरकार आहे. त्‍यामुळे कोणत्‍या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत वरील तिघांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्‍वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.

उद्धव ठाकरे हे हिंदू धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्या स्टॅलीन यांच्याशी युती करून देव, देश आणि संस्कार संपवायला निघाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ‘महाविजय २०२४ संकल्‍प’ दौऱ्यानिमित्त कणकवलीत आलेल्‍या श्री. बावनकुळे यांची जाहीर सभा येथील भाजप कार्यालयासमोरील पटांगणात झाली.

Chandrashekhar Bawankule
कोल्हापूर, हातकणंगलेतून शरद पवार हुकमी एक्के काढणार बाहेर; 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा, शेट्टींच्या अडचणी वाढणार

यावेळी त्‍यांनी पंतप्रधान मोदींच्या ध्येय धोरणाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी आमदार नीतेश राणे, भाजप जिल्‍हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, जिल्‍हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule
जयंत पाटलांचे कट्टर समर्थक मानसिंगरावांचा कोणाला पाठिंबा, साहेब की दादा? 'या' बैठकीला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण

बावनकुळे म्हणाले, ‘‘संकल्‍प दौऱ्यात कणकवलीतील ८२३ जणांशी संवाद साधला. यातील एक व्यक्‍ती वगळता अन्य सर्वांनी मोदींनाच पंतप्रधान म्‍हणून पसंती दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता उरलेले सर्व आमदार शिंदे गटात जातील. राज्‍यात ४८ पैकी महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील. रत्‍नागिरी-सिंधुदुर्गातील ५१ टक्‍के मते ही भाजपची आहेत.’’

महिलेच्या उत्तराने भ्रमनिरास

पदयात्रेदरम्‍यान श्री. बावनकुळे हे शहरातील एका कापड दुकानामध्ये गेले. तेथील एका महिलेला त्‍यांनी पुढील पंतप्रधान कोण? अशी विचारणा केली? त्‍यावेळी त्‍या महिलेने ‘मरूदेत ओ. कोणीही पंतप्रधान होऊंदेत’ असे उत्तर देताच श्री. बावनकुळेंचा भ्रमनिरास झाला. एका दुकान व्यावसायिकाने गडकरी पुढील पंतप्रधान व्हावेत, असे उत्तर देताच बावनकुळे तेथून बाहेर पडले. दरम्‍यान, बावनकुळे यांनी अशोक करंबेळकर यांच्याशी संवाद साधला. त्‍यावेळी त्‍यांनी राज्‍यात भाजपबाबत चांगलं जनमत नाही, असे सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Maratha Reservation : 'जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल, त्‍याला आता सुटी नाही'; जरांगे-पाटलांचा स्पष्ट इशारा

पदयात्रेत सावधानता

श्री. बावनकुळे आपल्‍या पदयात्रेत माईक घेऊन देशाचा पुढील पंतप्रधान कोण? अशी विचारणा करताना रत्‍नागिरी दौऱ्यात एकाने राहुल गांधी हे पुढील पंतप्रधान असतील, असे सांगितल्‍याने बावनकुळे यांची गोची झाली होती. त्‍यामुळे कणकवलीतील संवाद यात्रेत त्‍यांनी सावधानता बाळगली. पुढील पंतप्रधान कोण? अशी विचारणा केल्‍यानंतर मोदी हे उत्तर आल्‍यानंतरच ते आपल्‍याकडील माईक पुढे करत असल्‍याचे चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com