गोव्यात पुढे पूर्ण बहुमताचे सरकार, भाजपचे लक्ष्य 

प्रशांत शेटये
सोमवार, 17 जून 2019

मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी सुरु केली आहे. 

मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी सुरु केली आहे. 

लोकसभा निवडणूक व चार विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीनंतर भाजपने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी कंबर कसली आहे. पूर्ण बहुमतासाठी लक्ष्य केलेल्या मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र भाजपने सुरु केले आहे. या बैठकांमध्ये निवडणुकीतील यशापयशाचा ताळेबंद मांडून पुढील वाटचालीसाठी दिशा निश्चित करण्यात येत आहे. 

2017 च्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश न मिळाल्याने भाजपला सरकार स्थापन करण्यसाठी गोवा फाॅरवर्ड, मगो व अपक्ष आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागला. मगोची साथ सुटल्यानंतर बदललेल्या राजकीय स्थितीत पुढे जाण्यासाठी पक्षातर्फे रणनिती आखण्यात येत असून इतर पक्षांच्या कुबड्या न घेता स्वतःच्या दमावर स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याकडे भाजपने कल दाखवला आहे.   

`लवकरच जिल्हा पंचायतीच्या व त्यानंतर पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तर अडीच वर्षांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याचे भाजपचे उद्दीष्ट आहे, त्या दिशेने भाजपचे नेते व कार्यकर्ते कार्य करत आहेत`,  असे माजी खासदार व भाजपचे राज्य सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.  

`केंद्रात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आहे. एनडीएतील सर्व मित्रपक्षांना विश्वासात घेऊन भाजप पुढील विटचाल करणार आहे. गोव्यात भाजपचे जीस्तीत जास्त आमदार निवडून येणार असून भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास सावईकर` यांनी व्यक्त केला. 

गोव्यात 2012 च्या विधानसभा  निवडणुकीत  40 पैकी 21 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. 2012 मधील या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार भाजप नेत्यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp wants their government in Goa