कोरोनाच्या बहाण्यानं भाजपला राज्यात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप I DK Shivakumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Assembly Election 2023

'भाजप कोरोनाचं कारण देत जाणूनबुजून हे सगळं करत आहे.'

DK Shivakumar : कोरोनाच्या बहाण्यानं भाजपला राज्यात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

Karnataka Assembly Elections 2023 : पुढील वर्षी कर्नाटकात निवडणुका होणार आहेत, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केलीये. मात्र, केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

हेही वाचा: Coronavirus : कोरोनाचा उद्रेक होताच कर्नाटक सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 'मास्क'बाबत घेतला महत्वाचा निर्णय

'भाजप (BJP) कोविडचं कारण देत जाणूनबुजून हे सगळं करत आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेच्या बहाण्यानं भाजपला लवकर राज्यात निवडणुका घ्यायच्या आहेत. मात्र, या आरोपावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी टीका केलीये.

हेही वाचा: Basavaraj Bommai : संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट; सीमावादावरून मुख्यमंत्र्यांनी राऊतांना ठरवलं 'देशद्रोही'

बोम्मई म्हणाले, 'कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका वेळेपूर्वी घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत.' डीके शिवकुमार यांनी दावा केलाय की, 'भाजपला कोरोनाच्या बहाण्यानं राज्यात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामुळं ते लोकांना आकर्षित करण्यासाठी आरक्षणासारख्या मुद्द्यांची शिफारस करत आहेत. मात्र, हे सगळं कागदोपत्रीच आहे. निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी त्यांना दिल्लीतून पाचारण करण्यात आलंय, त्यामुळं ते कोरोनाचं कारण देत काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.'

हेही वाचा: Delhi Riots : दंगलीतील आरोपी उमर खालिदची तिहार तुरुंगातून सुटका; 'या' कारणासाठी 7 दिवसांचा जामीन मंजूर

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता पदयात्रा थांबवावी, असं सांगितलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं म्हटलं की, भाजपला या यात्रेच्या यशाची भीती वाटत आहे, म्हणून ही पदयात्रा थांबवली जात आहे' असा भाजपवर हल्लाबोल केला.