पाण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भाजप कार्यकर्त्याची हातोड्यानं ठेचत हत्या, २ सख्खे भाऊ गंभीर जखमी

पाण्यावरून पेटलेल्या वादाला हिंसक वळण लागून भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलीय. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे डेहराडूनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Hammer Attack During Water Row Leaves One Dead

Hammer Attack During Water Row Leaves One Dead

Esakal

Updated on

पाण्याच्या वादातून दोन गटात हिंसाचार झाला असून यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर त्याचे दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांसह २५ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण आहे. रात्री उशिरापर्यंत गावात गोंधळ निर्माण झाला होता. संतापलेल्या गावकऱ्यांनी प्रेमनगर पांवटा जुन्या महामार्गावर चक्का जाम केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com