दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी केली निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम आदमी पक्षाविरोधात निदर्शने करत आहेत. तत्पूर्वी आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर टीका केली आणि आरोप केला की, भाजपने त्यांना त्यांच्या पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आणि ते म्हणाले की ते त्यांच्यावर लागलेले सर्व सीबीआय आणि ईडी खटले बंद करतील.

हेही वाचा: ‘आप’ला रोखण्यासाठी माझा ‘बळी'; मनीष सिसोदिया

"भाजपला माझे उत्तर आहे - मी महाराणा प्रताप, राजपूत यांचा वंशज आहे. मी माझे डोके कापून घेईन, पण भ्रष्ट आणि कारस्थान करणाऱ्यांपुढे झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला हवे ते करा," असंही सिसोदिया यांनी ट्विट केलं आहे.

दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात गेल्या आठवड्यात सीबीआयने सिसोदिया यांच्या अधिकृत निवासस्थानाची झडती घेतली आणि अनेक ठिकाणी छापे टाकले.

भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे 'आप'ने म्हटले आहे.

Web Title: Bjp Workers Protest Against Aap Outside Delhi Cm Arvind Kejriwals Residence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpArvind Kejriwalaap