काश्मीरमध्ये मुस्लिमांच्या जागी हिंदू असते तर... : चिदंबरम

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

काश्मीरमधील अशांततेबद्दल आंतरराष्ट्रीय माध्यमे वृत्त देत आहेत. पण, भारतीय माध्यमांना सरकारने घेरून ठेवले आहे. काश्मीर शांत असल्याचा भाजप दावा करत आहे. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. काश्मीर हा भारताचा भाग आहे, यात काही शंकाच नाही. यात कोणाला शंका असेल तर ती भाजपला आहे. 

चेन्नई : जम्मू काश्मीरमध्ये हिंदूची संख्या जास्त असती तर भाजप सरकारने कलम 370ला हात लावण्याचेही धाडस केले नसते. येथे मुस्लिमांची संख्या जास्त असल्यानेच कलम 370 हटविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे.

चेन्नईत आयोजित एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर कलम 370 हटविण्यावरून आरोप केला. भाजपने आपली राजकीय ताकद लावून येथील कलम 370 हटविणअयाचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश केले आहेत. काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

चिदंबरम म्हणाले, की काश्मीरमधील अशांततेबद्दल आंतरराष्ट्रीय माध्यमे वृत्त देत आहेत. पण, भारतीय माध्यमांना सरकारने घेरून ठेवले आहे. काश्मीर शांत असल्याचा भाजप दावा करत आहे. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. काश्मीर हा भारताचा भाग आहे, यात काही शंकाच नाही. यात कोणाला शंका असेल तर ती भाजपला आहे. मुस्लिम बहुसंख्य असल्यानेच त्यांनी कलम 370 हटविले आहे. लोकसभेत आमच्याकडे बहुमत नसले तरी, राज्यसभेत सात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना मदत करणे हे दुर्दैवी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP wouldnt have touched Article 370 if Kashmir had Hindu majority says Congress leader P Chidambaram