

Nitish Nabin
esakal
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने आपल्या राष्ट्रीय संघटनेत महत्त्वपूर्ण बदल करताना बिहार सरकारमधील मंत्री आणि बांकीपुर मतदारसंघातील पाच वेळा निवडून आलेले आमदार नितीन नबीन यांची कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या संघटनात्मक क्षमतेसह निवडणूक रणनीती, प्रशासकीय अनुभव आणि जनतेशी असलेल्या थेट संबंधाला महत्त्व देताना ही जबाबदारी सोपवली आहे. पक्षातील सूत्रांच्या मते, हा फक्त संघटनात्मक बदल नसून भविष्यातील राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारा निर्णय मानला जात आहे.