
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर झालेल्या खर्चाच्या चौकशीचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच या बंगल्यावर कोट्यवधी रुपये उधळण्यात आल्याचा आरोप भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केला होता. या बंगल्याला ‘शीशमहल’ असे नाव देत ‘आप’ला कोंडीतही पकडण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. दक्षता आयोगाच्या या आदेशाने केजरीवाल हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.