politician Nusrat jahan
politician Nusrat jahan team esakal

...तर संसदेतील शपथ खोटी होती का?; नुसरतला मालवीय यांचा सवाल

सध्या सोशल मीडियावर नुसरत जहॉ ट्रेडिंगचा विषय आहे.

मुंबई - अभिनयातून राजकारणात गेलेल्या नुसरत जहॉपुढील (nusrata jahan)अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यावर चर्चा सुरु आहे. नुसरतनं कुणाशी लग्न केलं, त्याचे पुढे काय झाले, ती कुणासोबत राहते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र ज्यावेळी त्यांनी संसदेत शपथ घेतली ती खोटी (false oath) होती का असा प्रश्न भाजपचे नेते अमित मालविया यांनी तिला विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर नुसरत जहॉ ट्रेडिंगचा विषय आहे. तिच्यावरुन वेगवेळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत. (bjps amit malviya post video of nusrata jahan ruhi jain oath in parliament)

नुसरज जहॉ त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात याच्याशी काहीही संबंध नसला तरी त्यांनी ज्यावेळी सभागृहात शपथ घेतली ती खोटी होती का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. गरोदर (pregnent) असणा-या नुसरत पुढील समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. मी नुसरत जहॉ रुही जैन शपथ घेते की, असा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. त्यावरुन ती ट्रोल झाली आहे.

प्रसिध्द बंगाली अभिनेत्री (famous bengali actress) राजकीय क्षेत्रात आली खरी, मात्र यावेळी तिला मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. तिनं आपण उद्योगपती निखिल जैनशी लग्न केलं नसल्याचे सांगून मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे त्याच्या नावानं खासदारकीची शपथ घेणा-या नुसरत जहॉची खासदारकी धोक्यात आल्याचे दिसते आहे. यावरुन तिला विरोधकांनीही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणावर भाजपचे नेते अमित मालवीय म्हणाले, नुसरतनं जेव्हा लोकसभेमध्ये शपथ घेतली तेव्हा त्यात तिनं आपल्या पतीचे नाव घेतलं होतं. आता तिनं आपला पती जैन नसल्याचे सांगितले आहे. यावरुन तिनं संसदेत शपथ खोटी घेतली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मालवीय हे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत. त्यांनी नुसरत जहॉच्या शपथ विधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावरुन नुसरत ट्रोल होताना दिसत आहे.

politician Nusrat jahan
खासदार नुसरत जहांच्या रिलेशनशिपची चर्चा; यश दासगुप्ता आहे तरी कोण?

नुसरत जहाँनं संसदेत शपथ घेण्याआधी हे लग्न केलं होतं. शपथ घेताना तिनं सलाम वालेकुम, नमस्कार असे म्हणत मी, नुसरता जहाँ रुही जैन.... असे म्हणत शपथ घेतली होती. तिच्याविषयी सांगायचे झाल्यास, 2019 मध्ये उद्योगपती निखिल जैन याच्याशी ती विवाहबध्द झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com