esakal | शेवटपर्यंत 'काटे की टक्कर' दिल्यानंतर मेट्रोमॅन श्रीधरन पराभूत

बोलून बातमी शोधा

श्रीधरन
अखेर मेट्रोमॅन श्रीधरन पराभूत
sakal_logo
By
दीनानाथ परब

संपूर्ण देशात मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई.श्रीधरन यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपाने त्याना केरळच्या पलक्कड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. ई.श्रीधरन हा प्रतिष्ठीत आणि जनमानसात ओळख असलेला चेहरा आहे. श्रीधरन यांनी आपल्या कुशल कार्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांचे वलय लक्षात घेऊनच भाजपाने त्यांना पलक्कडमधुन उमेदवारी दिली होती.

पण काँग्रेस उमेदवार शफी पारामबील यांनी त्यांचा पराभव केला. श्रीधरन यांनी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये घेतलेली आघाडी १७ व्या फेरीपर्यंत कायम टिकवली. पण शेवटच्या फेरीत पिरायीरी, माथुर आणि कान्नाडी या पंचायतीमधील मतदारांमुळे काँग्रेस उमेदवार शफी पारामबील विजयी झाले.

निवडणूक प्रचारामध्ये पलक्कडमधुन श्रीधरन यांना मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठिंबा मिळत होता. एका मुलाखतीमध्ये ८८ वर्षीय श्रीधरन यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. आमदार झाल्यानंतर कामकाज करण्यासाठी त्यांनी कार्यालयही घेतले होते व पलक्कडमध्ये एक घर भाड्यावर घेतले होते.