टि्वटरनेच म्हटलं संबित पात्रांच ते टि्वट म्हणजे 'हेरा-फेरी मीडिया' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambit patra criticizes Rahul gandhi

टि्वटरने संबित पात्रांच्या टि्वटला ठरवलं 'हेरा-फेरी मीडिया'

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी १८ मे रोजी काँग्रेसवर आरोप करणारे एक टि्वट केले होते. या टि्वटला खुद्द टि्वटरनेच हेरा-फेरी, छेडाछाड करणारे टि्वट (Manipulated Media) ठरवले आहे. संबित पात्रा यांनी त्या टि्वटमध्ये (twitter) काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड हाताळीत अपयशी ठरले, हे दाखवण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठी टूलकिट बनवल्याचा आरोप केला होता. पण टि्वटरने पात्रा यांचे ते टि्वट हेराफेरी मीडिया असल्याचे म्हटले आहे. (BJPs Sambit Patras 'Toolkit Post Marked Manipulated Media By Twitter)

काँग्रेसने टि्वटरकडे संबित पात्रा आणि अन्य भाजपा नेत्यांची टि्वट हटवण्याचा आग्रह केला होता. संबित पात्रा यांनी १८ मे रोजी #CongrssToolkitExposed या हॅशटॅगसह टि्वट पोस्ट केले होते. जे अनेक भाजपा नेत्यांनी शेअर केले. "मित्रांनो काँग्रेसच्या टूलकिटकडे लक्ष द्या. कोरोना साथीच्या काळात गरजवंतांना मदत केल्याचं दाखवत आहेत. पण मित्र पत्रकार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने हा पीआर अभ्यास जास्त वाटतो. काँग्रेसचा अजेंडा तुम्ही वाचा #CongressToolKitExposed" असे लिहून कागदपत्रांचे स्क्रिनशॉट शेअर केले होते.

हेही वाचा: भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, 'बोलत नाही करुन दाखवतो'

काँग्रेसने गुरुवारी टि्वटरवर तक्रार केली होती. पात्रा आणि अन्य भाजपा नेत्यांनी शेअर केलेले स्क्रिनशॉट बनावट होते. चुकीची माहिती आणि समाजात अशांतता निर्माण केल्याबद्दल त्यांची खाती कायमस्वरुपी बंद करावीत, अशी मागणी काँग्रेसने केली होती.

loading image
go to top