भाजपाने कोकणवासियांना दिलं छप्पर, 'बोलत नाही करुन दाखवतो' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, 'बोलत नाही करुन दाखवतो'

भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, 'बोलत नाही करुन दाखवतो'

मुंबई: राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आहेत. 'तौक्ते' चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची ते पाहणी करत आहेत. कोकण किनारपट्टी भागाला या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे, बागायतींचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकण भाजपाकडून वादळग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनी वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यावेळी अनेक नागरिकांनी वादळामुळे घराचे छप्पर उडून गेल्याची व्यथा बोलून दाखवली. त्यांना डोक्यावर छप्पर हवे होते. कोकणातील भाजपा नेत्यांनी तात्काळ पावलं उचलत ज्यांचे घराचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी कौल आणि पत्र्याची व्यवस्था केली.

हेही वाचा: डॅडींच्या 'दगडी चाळी'वर लवकरच पडणार हातोडा!

भाजपाने या मदतकार्याचा फोटो टि्वट करतान 'आम्ही बोलत नाही, करुन दाखवतो' असे म्हटले आहे. या मदतसाहित्याचे वाटप करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राजन तेली उपस्थित होते.

हेही वाचा: सेलिब्रिटींच्या लसीकरणावरुन आदित्य ठाकरेंवर मोठा आरोप

नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ - उद्धव ठाकरे

विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ, अशी माहिती मुख्यंत्र्यांनी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली. पंचनामे पूर्ण होताच मदती संदर्भात निर्णय घेणार असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौरा (Kokan Visit)दरम्यान केले आहे. कोणत्याही निकषानुसार मदत जाहीर करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरणार आहे असे ते म्हणाले.

loading image
go to top