Virendra Sachdeva : सभ्य समाजात केजरीवालांसारख्या नक्षलवाद्यांची गरज नाही : भाजप
Arvind Kejriwal : जंतर मंतरवरील ‘घर-रोजगार बचाओ’ आंदोलनात अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केल्यानंतर, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल यांच्यावर नक्षलवादी विचारसरणीचा आरोप केला. सभ्य समाजात अशा विचारांची गरज नसल्याचे ते म्हणाले.
नवी दिल्ली : ‘‘सभ्य समाजात अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नक्षलवाद्यांची गरज नाही,’’ अशी टीका दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.