Ahmedabad Plane Crash : ‘एएआयबी’त उलगडणार कारण; ब्लॅक बॉक्सची तपासणी; अंतिम अहवालास किमान सहा महिने लागणार
Black Box : अहमदाबाद विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स २८ तासांत सापडला आहे आणि दिल्लीतील विमान अपघात तपास संस्थेने त्याची तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक कारण एक महिन्यात समजेल, पण अंतिम अहवाल तयार होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
पुणे : अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स २८ तासांतच तपास पथकांना आढळून आला. देशातील एकमेव दिल्ली येथील विमान अपघात तपास संस्थेच्या (एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो) ताब्यात हा ब्लॅक बॉक्स असून तेथे त्याची तपासणी होणार आहे.