Blast On Railway Track: उदयपूर-अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर स्फोट! PM मोदींनी 13 दिवसांपूर्वी केलं होतं उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

blast on udaipur ahmedabad railway track explosion found pm modi inaugurate it 13 days ago

Blast On Railway Track: उदयपूर-अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर स्फोट! PM मोदींनी 13 दिवसांपूर्वी केलं होतं उद्घाटन

13 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री सुरू केलेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आह. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रेल्वे ट्रॅक उखडण्याच्या प्रयत्नात प्रथमदर्शनी ब्लास्टिंग करण्यात आले असून घटनास्थळी स्फोटके सापडली आहेत. वास्तविक घटनास्थळाच्या आजूबाजूला खाणकाम देखील सुरु आहे. पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळाच्या दोन्ही बाजूंनी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या नव्या मार्गावर मोठी दुर्घटना टळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सालूंबर मार्गावरील पुलावर शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. येथे काल रात्री 10 वाजता गावकऱ्यांना स्फोटाचा आवाज आला. यानंतर काही तरुण तातडीने ट्रॅकवर पोहोचले. रेल्वे रुळावर स्फोटकं पडल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पूल उडवून देण्याचा कट रचला गेल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Kalyani Kurale Jadhav Passed Away: तुझ्यात जिव रंगला फेम कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाती मृत्यू...

अनेक ठिकाणी रुळ तुटले आहेत. पुलावरील लाइनमधून नट-बोल्टही गायब असल्याचे आढळून आले. रुळावर एक पातळ लोखंडी पत्राही उखडलेला आढळून आला. या घटनेला दुजोरा देताना उदयपूरचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा म्हणाले की, एफएसएल टीम घटनास्थळी आहे. तपासानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल. रेल्वेच्या अजमेर विभागाचे जनसंपर्क अधिकारी अशोक चौहान यांनी ही घटना घडल्याचे सांगितले. दरम्यान याप्रकरणी तपास सुरू आहे. घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

रेल्वेने रेल्वे वाहतूक बंद केली

रेल्वेकडून रुळ दुरूस्तीचे काम सुरू असल्याची माहिती चौहान यांनी दिली. सध्या अहमदाबाद असारवा ट्रेन डुंगरपूर ते असारवा अशीच चालणार आहे. उदयपूर-असारवा ट्रेन रोज संध्याकाळी 5 वाजता सुटते. जी रात्री 11 वाजता असारवा येथे पोहोचते. तसेच असारवा-उदयपूर दररोज सकाळी 6:30 वाजता सुटते आणि 12:30 वाजता उदयपूर सिटी स्टेशनला पोहोचते.

हेही वाचा: Sushma Andhare: विभक्त पती वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर अंधारे स्पष्टच बोलल्या..

टॅग्स :Narendra Modi