Sushma Andhare: विभक्त पती वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर अंधारे स्पष्टच बोलल्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare: विभक्त पती वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर अंधारे स्पष्टच बोलल्या..

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करतात. त्याच सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दरम्यान सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. पुढील वाटचालीसाठी सुषमा अंधारे यांनी त्यांच्या विभक्त झालेल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. कोण कोणत्या गटात जात याने मला फरक पडत नाही. ज्याला त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: Sushma Andhare: सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार; विभक्त पती ॲड. वाघमारे यांचा इशारा

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, मी गेली 4 ते 5 वर्षे विभक्त राहते आहे. त्यामुळे व्यक्ति म्हणून त्यांना निर्णय घेण्याचं स्वतंत्र आहे. मी त्यांच्या कारकीर्दीलाही शुभेच्छा देईल या पलीकडे बोलण्यासारख माझ्याकडे काहीच नाही. ते याआधी कुठं होते हेही मला माहीत नाही. मला त्यांच्याबद्दल काही बोलवसही वाटतं नाही. सर्वांच वैयक्तिक आयुष्य असतं, सर्वांचा भूतकाळ असतो त्यामुळे मला यावर काहीच बोलव वाटतं नाही.

गेल्या 4 वर्षापासून आम्ही वेगळे राहत असल्यामुळे प्रतिक्रिया देणं योग्य नाही असंही अंधारे म्हणाल्यात. त्यांनी कुठेही गेल्याने काही फरक पडत नाही असंही त्या पुढे म्हणाल्यात.

हेही वाचा: सर्वजण आता जास्त शहाणे झालेत, देवानं त्यांना रातोरात अक्कल दिलीय; पटेलांचा बावनकुळेंवर घणाघात