पतंग महोत्सवात अंध मुलांनी केला विक्रम

महेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जानेवारी 2017

अहमदाबाद : गुजरातमध्ये झालेल्या पतंगोत्सवात एकीकडे अंध मुलांनी जागतिक विक्रम केला, तर पतंगबाजीमुळे अनेक पक्षी जखमी झाले तर काही जीवानिशी गेले.

राजकोट येथे चार हजार अंध मुलांनी पतंग उडवून एक अनोखा विक्रम केला. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते. मात्र, हा पतंगोत्सव पक्षांसाठी खूपच महाग पडला. यामुळे अनेक पक्षी जखमी झाले, तर अनेक पक्षी मृत्युमुखी पडले.

अहमदाबादमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे 1712 पक्षी जखमी झाले किंवा मृत्युमुखी पडले आहेत. जखमी पक्ष्यांचे प्राण सामाजिक संस्थांनी आणि पक्षिप्रेमींनी वाचविले आहेत. मरण पावणाऱ्या 67 पक्ष्यांपैकी 62 कबुतरे आहेत. दुसरीकडे पतंग पकडण्याच्या प्रयत्नात गच्चीवरून पडून एका युवकाचा मृत्यू झाला.

Web Title: blind boys makes record in kite festival