बॉबी देओलनं केली काकाची हत्या, सनी देओल तुरुंगात! जाणून घ्या काय आहे हा प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

बॉबी देओलनं केली काकाची हत्या, सनी देओल तुरुंगात! जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Bihar Crime Case: बॉलिवुड स्टार्सला चाहते फॉलो करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यांच्या डोक्यात अशी क्रेझ असते की त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे नाव आपल्या नावा पुढे लावावे. पण जेव्हा प्रचंड राग येते तेव्हा ते विसरतात की त्यांच्या चुकीच्या चालीमुळे आपल्या आवडत्या अभिनेत्याचे नाव खराब होते.

हेही वाचा: पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तुम्ही की शिंदे? फडणवीस म्हणाले आमच्याकडे...

असाच एक धक्कादायक प्रकार बिहारमधील आरामध्ये समोर आला आहे. आराह येथील रहिवासी असलेल्या बॉबी देओल (Bobby Deol) नावाच्या व्यक्तीने परस्पर वैमनस्यातून आपल्या काकांची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे आरोपी बॉबी देओलचा (Sunny Deol) मोठा भाऊ सनी देओल देखील तुरुंगात आहे.

पोलिसांनी सांगितले की, आराहच्या रौझामध्ये पुतण्याने चाकूने वार करत काकांची हत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. बॉबी देओल याने काका रमेश कुमार यांच्यावर काही कारणावरून चाकूने वार केले आणि त्यांचा मृत्यु झाला.

या घटनेनंतर लगेचच तेथे उपस्थित लोकांनी रमेशला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रमेशची प्रकृती खालावत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला पाटणा येथे रेफर केले. वाटेतच रमेशचा मृत्यू झाला.

हेही वाचा: ....तर गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा; अजित पवारांच्या नाराजीवर मनसेची खोचक टीका

मृत रमेशचा भाऊ मनोजने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बॉबी देओल आणि रमेश कुमार यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर बॉबी देओलच्या डोक्यात राग होता. संधी मिळताच बॉबीने रमेशची निर्घृण हत्या केली.

मॉली येथे खासगी नोकरी करणाऱ्या मनोजलाही बॉबी आणि रमेश यांच्या भांडणाचा फोन आला. फोन येताच मनोजने रमेशला गाठले, मात्र तोपर्यंत बॉबीने रमेशला मारले होते.

मनोजच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पुतण्या बॉबी देओल उर्फ ​​रवी कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेमागचे खरे कारण समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे बॉबी उर्वा रवीच्या मोठ्या भावाचे नाव सनी देओल आहे. सनी देओलही तुरुंगात आहे.

टॅग्स :Biharpolicecrime