esakal | कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी नव्हते कोणीही तयार मग...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी नव्हते कोणीही तयार मग...

नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची प्रतिक्षा केली नाही; रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण.

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी नव्हते कोणीही तयार मग...

sakal_logo
By
कृपादान आवळे

हैदराबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच यामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या मदतीला कोणी येत नसल्याच्या अनेक घटना पाहिला मिळाल्या. त्यानंतर आता तेलंगणातही अशाच प्रकारची घटना घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

राज्यातील निजामाबाद येथे एका सरकारी रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. ही बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित मृतदेह रुग्णवाहिकेतून नेण्यास नकार दिला. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे कसे हा मोठा प्रश्न पडला. त्यानंतर अखेर हा मृतदेह रिक्षाच्या मदतीने अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित मृताचा नातेवाईक रुग्णालयातच काम करतो. त्याच्या विनंतीवरून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. या मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या शवागारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मदतीने मृतदेह रिक्षात ठेवला. त्या ऑटोरिक्षातूनच तो मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आला, अशी माहिती निजामाबाद सरकारी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागेश्वर राव यांनी दिली.

दरम्यान, सध्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती जरी मिळाली तरी लोकांमध्ये भीती निर्माण होते. परिणमी दुय्यम वागणूक दिली जाते. अशाच प्रकारच्या घटना यापूर्वी अनेक ठिकाणी घडल्या आहेत. 

कोरोनाच्या भीतीपुढे माणुसकी हरली, कचरागाडीतून नेला मृतदेह

नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची प्रतिक्षा केली नाही

निजामाबाद येथील सरकारी रुग्णालयात संबंधित रुग्णाला दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आमच्या रुग्णालयात काम करणाऱ्या त्याच्या नातेवाईकांनी आम्हाला मृतदेह देण्यास सांगितले. त्यांच्या विनंतीनंतर आम्ही मृतदेह ताब्यात दिला. त्यांनी रुग्णवाहिकेची प्रतिक्षा न करता रिक्षाच्या मदतीने मृतदेह घेऊन गेले, असे डॉ. राव यांनी सांगितले. 

loading image