esakal | कोरोनाच्या भीतीपुढे माणुसकी हरली, कचरागाडीतून नेला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

up viral video

ऍम्ब्युलन्स असूनही वैद्यकीय स्टाफने कोरोनाच्या भीतीने मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यानंतर मृतदेह कचरा वाहणाऱ्या गाडीतून पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कोरोनाच्या भीतीपुढे माणुसकी हरली, कचरागाडीतून नेला मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ, ता. 11 (पीटीआय) : कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या कोरोनाच्या भीतीने लोक आता माणुसकी विसरत चालले आहेत की काय असा प्रश्न पडतो. रस्त्यावर झालेल्या 42 वर्षीय व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह कचरा वाहणाऱ्या गाडीतून पोलिस ठाण्यात नेण्यात आला. याबाबतचा व्हिडिओ गुरूवारी व्हायरल झाला आहे. शेजारीच ऍम्ब्युलन्स असूनही वैद्यकीय स्टाफने कोरोनाच्या भीतीने मृतदेह उचलण्यास नकार दिला. माणुसकीशून्यता दाखविणारी ही घटना उत्तरप्रदेशातील बलरामपूरमध्ये घडली.

Video: सॅनिटाझरला समजले तीर्थ अन्...

पोलिस अधीक्षकांनीही या प्रकारावर टीका केली असून संबंधितांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. नगरपालिकेने मृतदेह घेऊन जाण्यासाठी कचरागाडीचा वापर केला. या प्रकरणी 7 सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये एक पोलिस उपनिरीक्षक, 2 कॉन्स्टेबल आणि नगरपालिकेच्या चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राजस्थानात काँग्रेससह अपक्ष आमदार हॉटेलवर हलवले, भाजपकडून घोडेबाजार?

बलरामपूरमधील रहिवासी मोहम्मद अन्वर हे स्थानिक सरकारी कार्यालयात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ते रस्त्यावर पडत असल्याचा व्हिडिओ चित्रित झाला आहे. त्यानंतर त्याठिकाणी पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी आले. त्याचेही व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल झाले आहे. त्यामध्ये बाजूला रुग्णवाहिला उभी असल्याचे दिसत आहे.

दिलासादायक! देशात पहिल्यांदाच बरे झालेल्यांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा अधिक​

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मृताला कोरोना असल्याच्या शक्‍यतेने रुग्णवाहिकेत घेण्यास नकार दिला. त्यानंतर महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांनी मृतदेह बांधून कचऱ्याच्या गाडीत ठेवला. हे सर्व पोलिस कर्मचारी पाहात आहेत. घटनेचा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले असून, हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

पवारांनीच सर्कस असल्याचे केले मान्य ! चंद्रकांत पाटील यांची राजनाथसिंह-पवार वादात उडी

कोरोना महामारीच्या घाईत काही जणांनी माणुसकीहीन वृत्तीचे दाखविली आहे. संबंधित व्यक्तिला कोरोनाचा संसर्ग असता तरी, पीपीई सूट घालून त्याचा मृतदेह कर्मचारी उचलून नेऊ शकले असते. परंतु, पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनीही चुकीची कृती केली आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर योग्य कारवाई होईल.
देवरंजन वर्मा, पोलिस अधीक्षक, बलरामपूर