esakal | तमिळनाडूमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

तमिळनाडूमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू अन्...

विशाखापट्टणम येथे वायू गळती

तमिळनाडूमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चेन्नई : तमिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून, 17 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (बुधवार) घडली. कुड्डालोर जिल्ह्यातील नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन पॉवर प्लांटमध्ये स्टेज-2 मधील एका बॉयलरमध्ये स्फोट झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुड्डालोर जिल्ह्यातील नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन पॉवर प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे. यातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही आग नेमकी कशी लागली याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. या स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या दुर्घटनेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी शोक व्यक्त केला असून, यामध्ये मृत पावलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जे लोक या घटनेत जखमी झाले आहेत, अशा लोकांना उपचारासाठी एक लाखाची मदत दिली जाणार आहे. 

विशाखापट्टणम येथे वायू गळती

आंध्र प्रदेशामधील विशाखापट्टणम येथे वायू गळती झाली होती. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री घडली होती. त्यानंतर आता तमिळनाडूत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली.  

loading image