बोकारो : झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. गोमिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरहोर्डेरा जंगल (Birhordera Forest) परिसरात झालेल्या या कारवाईत, २५ लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी कुंवर मांझीसह दोन नक्षलवाद्यांचा (Naxalites) खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलंय. मात्र, या कारवाईत सीआरपीएफच्या कोब्रा २०९ बटालियनचा एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.