
तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (टीपीसीसी) चे सरचिटणीस गडम चंद्रशेखर रेड्डी यांना स्फोटक पदार्थाशी संबंधित एका गंभीर प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (०५ जुलै २०२५) रात्री १० वाजता त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ निजामाबाद तुरुंगात पाठवले. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.