esakal | दिल्लीतून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटला उडवण्याची मिळाली सनसनाटी धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

Aeroplane

दिल्लीतून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटला उडवण्याची मिळाली सनसनाटी धमकी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : दिल्लीतील एका पोलिस ठाण्यामध्ये एका व्यक्तीने फोन करुन लंडनला जाणाऱ्या फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. या फोन कॉलनंतर दिल्ली पोलिसांसमवेत अनेक तपास यंत्रणा फोन कॉलसंदर्भातील तपासामध्ये गुंतल्या आहेत. या कॉलमुळे सध्या चिंतेचं वातावरण असून यासंदर्भात काय तथ्य आहे, ते तपासण्याचं काम गतीने सुरु आहे. असं सांगितलं जातंय की, हा फोन आऊटर दिल्लीच्या रणहौला ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा आला होता. यानंतर दिल्ली पोलिसांसमवेत अनेक सुरक्षा एजन्सी हा फोन कुणी केला आहे, याचा तपास करत आहेत.

हेही वाचा: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

या फोननंतर सुरक्षा एजन्सींनी दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टची सुरक्षा आणखी वाढवली. यानंतर पोलिसांकडून प्रवाशांना विशेष सुचना देण्यात आली की विमान प्रवासासाठी प्रवाशांनी वेळेआधीच पोहोचावं. सोबतच त्यांनी म्हटलं की, एअरपोर्टवर वाहनांची तपासणी केली जाईल.

हेही वाचा: Sakinaka Rape Case: कठोर शिक्षेचा 'शक्ती कायदा' सध्या कुठे अडकलाय?

9/11 च्या पार्श्वभूमीवर हल्ल्याची धमकी

जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार गुरुवारी रात्री साडेदहा वाजता कुणीतरी नागलोई ठाण्यात फोन केला होता. फोन करणाऱ्याने म्हटलं होतं की, 9/11 च्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान बॉम्बस्फोटाने उडवून लावण्यात येणार असल्याची माहिती त्याने दिली. ही माहिती मिळताच संपूर्ण पोलिस ठाण्यात मोठ्या हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर तपासाअंती हा कॉल फेक असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सुरक्षा एजन्सींनी फ्लाईटच्या उड्डाणासाठी परवानगी दिली. मात्र, हा फोन कुणी केला, याचा तपास अद्याप सुरु आहे.

loading image
go to top