esakal | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

vijay rupani

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

sakal_logo
By
सुधीर काकडे

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटल्यावर त्यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपण स्वखुशीने राजीनामा दिला असून, गुजरातला आता नवे नेतृत्व मिळेल असे सांगितले आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आपण पक्षाने गुजरात नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल पक्षाचे आभारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

गांधीनगरमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतल्यानंतर विजय रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी विजय रुपाणी यांनी ‘आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहोत, यानंतर पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आपण स्विकारु’ असे सांगितले. तसेच पक्षाने आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार देखील मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील त्यांनी आभार मानले.

हेही वाचा: महापौर ते मुख्यमंत्री! विजय रुपाणींची राजकिय कारकीर्द एका क्लिकवर

दरम्यान, विजय रुपाणी यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांच्यासह गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भाजप नेते देखील उपस्थित होते.

loading image
go to top